गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी 20.77 लाख क्विंटलवर

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
- शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची गर्दी

गोंदिया, 
Gondia Paddy Procurement जिल्ह्यात रब्बी पणन हंगाम 2025-26 अंतर्गत आधारभूत धान खरेदी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 47 हजारांहून अधिक शेतकर्‍यांकडून 20.77 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, 193 खरेदी केंद्रांनी धान खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून त्यापैकी 191 केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली आहे. धानाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख असून जिल्ह्यात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात धानपीक घेतले जाते. दरम्यान, यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात एकूण 77 हजार 620 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. 2 जून 2026 पर्यंत 46 हजार 103 शेतकर्‍यांकडून 20 लाख 30 हजार 432.62 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती.
 
 
dhan
 
Gondia Paddy Procurement  त्यानंतर 3 जून रोजी एकाच दिवशी 1 हजार 167 शेतकर्‍यांकडून 47 हजार 117.14 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यामुळे एकूण खरेदीचा आकडा 20 लाख 77 हजार 549.76 क्विंटल इतका झाला आहे. खरेदी केलेल्या धानासाठी 2,369 रुपये प्रति क्विंटल या आधारभूत दराने सुमारे 492 कोटी 17 लाख रुपयांहून अधिक रक्कम शेतकर्‍यांना देय होणार आहे. जिल्ह्यात मका खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मक्यासाठी 17 केंद्रांवर नोंदणी व खरेदीची व्यवस्था करण्यात आली असताना 14 केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे. त्यात आतापर्यंत 3 हजार 620 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. 3 जून रोजी पर्यंत जिल्ह्यात 30 हजार 60.50 क्विंटल इतकी मका खरेदी झाली असताना 589 शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळाला आहे. यात आधारभूत दरानुसार 7 कोटी 21 लाख रुपयांची देयके अदा करण्यात येणार आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील धान आणि मका उत्पादक शेतकर्‍यांना आधारभूत किमतीचा लाभ मिळावा यासाठी खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व पणन विभागाच्या समन्वयातून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे हजारो शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.