उमरखेडमध्ये बेकायदेशीर कचरा डेपो

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : प्रशासन मात्र गप्पच

उमरखेड, 
Illegal garbage dump शहरातील प्रभाग 3 मधील मुरलीशेठ यांच्या मळ्याजवळ बेकायदेशीरपणे निर्माण झालेल्या कचरा डेपोमुळे नागरिक, शाळकरी मुले आणि मुक्या जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पावसाळ्यात घाण आणि दुर्गंधाने परिसर हैराण होणार आहे. यासंदर्भात उमरखेड येथील या प्रभागाचे रहिवासी सुरेंद्रनाथ दळवी यांनी जिल्हाधिकारी विकास मीना आणि उमरखेड नगर परिषदेकडे तक्रार देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.
 
 
KACHARA
 
Illegal garbage dump  या ठिकाणी प्लॅस्टिक, पॉलिथिन आणि घाणीमुळे जनावरे आजारी पडत आहेत. प्राथमिक शाळेच्या मार्गावरच कचèयाचे साम्राज्य असल्याने लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषदेचा हा प्रकार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 चा सरळ भंग असून स्वच्छ भारत अभियानाचा अवमान आहे, असा आरोप दळवी यांनी केला आहे. यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.