इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये लाखोचा अपहार

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
दोन डॉक्टर विरुद्ध गुन्हे दाखल
खोटे शिक्के व बनावट कागतपत्रे तयार करून केला अपहार
 
बुलडाणा,
Indian Medical Association  येथील नामांकित लिलावती बल्ड बँकचे डॉ. अजित शिरसाठ व डॉ गजेंद्र निकम तसेच इंडियन मेडीकल असोसिएशनच्या इतर दोघांच्या संगनमताने इंडियन मेडीकल असोसिएशनचे लेटरहेड व नोंदणी क्रमांकांचा बनावट दस्तऐवज तयार करून इंडीयन बँकेतून लाखो रुपयाची रक्कम परस्पर काढून अपहार केला होता याप्रकरणी आय. एम. ए. च्या वतीने डॉ. जादूसिंग भाऊलाल राजपूत यांनी बुलडाणा पोलिस स्टेशनला रीतसर तक्रारही केली होती. तथापि पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. नुकताच बुलडाणा न्यायालयाने यावर निकाल दिला असून दोन्ही डॉक्टर विरुद्ध न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 
 
Indian Medical Association
 
Indian Medical Association  या बाबत माहिती अशी की, बुलडाणा येथील इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉ. अजित शिरसाठ व डॉ. निकम हे अध्यक्ष किंवा सदस्य नसतानाही डॉ. शिरसाठ व डॉ. निकम यांनी इतर दोघांच्या संगनमताने संस्थेचे बनावट शिक्के व कागतपत्रे तयार करून इंडियन बँकेत सादर करून व्यवहाराची परवानगी मागितली. इंडीयन बँकेचे शाखाधिकारी यांनी कोणतीही शहानिशा न करता इंडियन मेडीकल असोसिएशनचे खाते हाताळणी व व्यवहाराची परवानगी दिली. दरम्यान डॉ. अजित दलसिंग शिरसाठ यांनी शाखाधिकारी यांचेशी संगनमत करून इतर दोघांच्या सह्यांनिशी दिं. १५ मे २०२३ ते दि. १५ सप्टेंबर २०२३ या काळात ५ लाख ७८ हजार ८९७ रुपये रक्कम काढून अपहार केला. तसेच या कालावधीमध्ये त्यांनी बुलडाणा शहरातील डॉटरांकडून ७ लाख ६० हजार ३८ रुपये रकमेची कोणत्याही डॉटरांना आजपर्यंत पावती दिलेली नाही. पैशांचा अपहार केल्याचे बँकेच्या अकाऊंट स्टेटमेंटवरून दिसून आले. त्यांनी अपहार केलेल्या रकमेचा कोणताही हिशोब सहाय्यक धर्मादाय आयुक्त, यांच्याकडे सादर केलेला नाही. डॉ. शिरसाठ हे अध्यक्ष नसतानाही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बनावट शियाचा वापर करून संस्थेची फसवणूक करीत होते या संदर्भात त्यांनी अनेक वेळा जिल्हा शल्य चिकित्सक यांना केलेल्या पत्र व्यवहारात स्वतः अध्यक्ष दर्शविले आहे या संदर्भातही त्यांच्याविरुद्ध डॉ. जेे. बी. राजपूत यांनी तक्रार केली होती. याप्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल काढण्यात आला असून पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे हे तपास करित आहे.
 

बँकेतून एक रूपया ही काढला नाही माझा छळ करण्याचा प्रयत्न : डॉ. अजित शिरसाट
या प्रकरणी प्रतिक्रीया देतांना डॉ. अजित शिरसाट यांनी सांगितले १९९२ पासून इंडियन मेडीकल असोशिएशनचा धर्मदाय आयुक्तांकडे ऑडिट व चेंज रिपोट झालेला नाही ही संस्था गिळकृत करण्याच्या हेतूने डॉ. जे. बी. राजपूत यांनी वारंवार माझ्या विरूद्ध पोलिस स्टेशनला तक्रारी केल्या आहेत. बँकेतन एक रूपयाही काढला नाही त्याऊलट माझी अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा लोकप्रतिनिधी सोबत तक्रारकर्ते व्यासपीठावर होते. १४० सदस्य असतांना केवळ हुकुमशाही पद्धतीने ४० सदस्यांना सोबत घेऊन कारभार सुरु आहे. केवळ आवाज उठविला त्यामुळे माझा छळ सुरु आहे. डॉ. गजेंद्र निकम यानी सांगितले बँकेच्या व्वहाराशी काही माझा कोणताही संबध नाही. धर्मदाय आयुक्तांकडे आतापर्यंत ऑडिट व चेंज रिपोर्ट सादर झालेला नाही. या संदर्भात ठाणेदार संग्राम पाटील न्यायलयाच्या आदेशाने गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली आहे.