मलेशियात यमिळवले घवघवीत यश
भंडारा:
International Abacus Examination नूतन महाराष्ट्र विद्यालयात 10 व्या वर्गात शिकत शिकणाऱ्या वेदांत विनय गंगणे याने मलेशिया येथील क्वाललामपूर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत (परीक्षा)भारताचा झेंडा रोवला आहे. ४ जून २०२६ रोजी झालेल्या या अत्यंत चुरशीच्या परीक्षेत त्याने दोन पेपर दिले.
International Abacus Examination या दोन्ही पेपरमध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखवत वेदांतने अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण व प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातून सुमारे ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कठीण परीक्षेत महाराष्ट्रातून केवळ १६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या १६ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विदर्भातील भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व एकट्या वेदांतने केले. या जागतिक पटलावर मिळवलेल्या या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र शाळेचे शिक्षक, पालक आणि संपूर्ण भंडारावासियांकडून त्याचे जोरदार अभिनंदन होत आहे.