मोठा घात! शेतात आढळले वडील आणि भावाचे मृतदेह

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
पुणे
Junnar double murder पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बागाडवाडी येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नाच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या वडिलांवर आणि भावावर लाकडी दांडक्याने हल्ला करून त्यांचा हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 

Junnar double murder  
मिळालेल्या माहितीनुसार, जयराम महादू मुकणे आणि राजू जयराम मुकणे हे दोघे आपल्या कुटुंबासह बागाडवाडी येथे वास्तव्यास होते. आरोपी बाबाजी जयराम मुकणे हा देखील त्यांच्यासोबतच राहत होता. मागील काही दिवसांपासून त्याचे लग्न जुळत नसल्याने तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. लग्न होत नसल्याचा राग त्याने कुटुंबातील सदस्यांवर काढत असल्याने घरात सातत्याने वाद निर्माण होत होते.मंगळवारी देखील अशाच प्रकारचा वाद पुन्हा उफाळून आला. त्यानंतर बाबाजी मुकणे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गेला, जिथे त्याचे वडील आणि भाऊ उपस्थित होते. तेथे त्याने त्यांच्याशी वाद घालत लाकडी दांडक्याने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. त्यानंतर आरोपीचा दुसरा Junnar double murder भाऊ युबराज मुकणे यांनी ओतूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बाबाजी मुकणे याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि लग्नाचा मुद्दा हे या घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेमुळे बागाडवाडी परिसरात शोककळा पसरली असून, गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.