एकतर्फी प्रेमातून महिला कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
मोहाली,
Knife attack from unrequited love मोहालीतील फेज 11 परिसरात गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. एसआरपी यूएस लॉजिस्टिक्स कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून आपल्या सहकारी महिलेवर चाकूने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीनेही स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेची ओळख 29 वर्षीय डिंपल अशी पटली आहे, तर आरोपीचे नाव हरजिंदर सिंग असून तो मूळचा पतियाळाचा असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही एकाच कंपनीत कार्यरत होते.
 
 
attk
 
प्राथमिक तपासानुसार, आरोपी डिंपलच्या एकतर्फी प्रेमात होता. घटनेच्या दिवशी त्याने तिला बोलण्यासाठी अडवले होते, मात्र डिंपलने नकार दिल्याने तो संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने आधीच आणलेल्या धारदार शस्त्राने डिंपलवर अनेक वार केले. गंभीर जखमी अवस्थेत ती जमिनीवर कोसळली.हल्ल्यानंतर आरोपीने त्याच चाकूने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डिंपलला मृत घोषित करण्यात आले. आरोपीची प्रकृती अद्याप गंभीर असल्याची माहिती आहे.
 
 
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पुरावे गोळा करून तपास सुरू केला. फेज 11 पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याचे स्पष्ट केले असून आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी सहजपणे शस्त्र घेऊन कार्यालयात कसा पोहोचला, याबाबतही तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.