कडोली,
makka kharedi godam कुरखेडा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी मका पिकाची लागवड केली असून शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत मका खरेदीसाठी अनेक शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. शासनामार्फत सुरू असलेल्या मका खरेदी प्रक्रियेची अंतिम मुदत 30 जून निश्चित करण्यात आली असतानाही तालुक्यातील अनेक शेतकर्यांना अद्याप मका खरेदीकरिता नंबर लागला नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी बांधवांना दिलासा देण्याकरिता मका खरेदी करिता गोडाऊन उपलब्ध करून देऊन मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये, अन्य पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी केली आहे.
makka kharedi godam मका खरेदी केंद्रांवर नोंदणी करूनही अनेक शेतकरी अजूनही आपल्या मालाच्या खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्याची दिलेली 30 जूनची मुदत संपुष्टात आल्यास अनेक पात्र शेतकरी शासनाच्या हमीभाव योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी, त्यांना आपला मका कमी दराने खासगी व्यापार्यांना विकावा लागत आहे.त्यामूळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकर्यांचे हित लक्षात घेता शासनाने तातडीने मका खरेदीची मुदत वाढवावी. तसेच मका साठवणुकीसाठी आवश्यक गोदामांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चांगदेव फाये यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी केली आहे. तालुक्यातील सर्व पात्र शेतकर्यांचा मका खरेदी प्रक्रियेत समावेश होऊन त्यांना हमीभावाचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.