भिवाडी औद्योगिक क्षेत्रात भीषण आग

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
भिवाडी,
fire in bhiwadi industrial area राजस्थानच्या भिवाडी औद्योगिक क्षेत्रात भीषण आग लागली असून, त्यात दोन कारखाने भस्मसात झाले आहेत आणि पाच जण जखमी झाले आहेत.
 
  
bhiwadi industrial area
 
भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील आग इतक्या वेगाने पसरली की, काही क्षणातच दोन्ही कारखाने  भस्मसात झाले. आगीच्या ज्वाला आणि धूर पाहून कामगार बाहेर धावले. या कारखान्यांमधील पाच कामगार आगीत भाजले. त्या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या वाहनांनी भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. औद्योगिक परिसरातील आगीचे कारण ट्रान्सफॉर्मरमधील स्फोट असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रान्सफॉर्मरमधील स्फोटानंतर त्यातील तेल जमिनीवर वेगाने पसरले. तेलासोबत आगीच्या ज्वालाही पसरल्या. आगीच्या ज्वाळांनी आजूबाजूच्या कारखान्यांना वेढायला सुरुवात केली.fire in bhiwadi industrial area ट्रान्सफॉर्मरजवळ असलेल्या दोन कारखान्यांना आग लागली आणि ते भीषणरीत्या जळू लागले. याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.