भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी ‘एक व्यक्ती एक बँक खाते’ रामबाण

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
आर्णी, 
'One person, one bank account' देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवी. ज्याप्रमाणे एक व्यक्ती, एक आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, शिधापत्रिका आहे तमेच ‘एक व्यक्ती : एक बँक खाते’ केले तर भ्रष्टाचार समूळ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कायदे कठोर करणे आवश्यक आहे, असे मत येथील शेतकरी व शिक्षक सचिन शिंदे यांनी व्यक्त केले.
 
 
bank
 
ते पुढे म्हणाले, ‘एक व्यती : एक बँक खाते’ यामध्ये सरकारी बँकेचे खाते असावे. ज्या खात्यात त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद व्हावी. ज्यांचे आधार कार्ड त्यांचे बँक खाते असे असावे. प्रत्येक खातेदाराला त्याच्या वार्षिक उत्पन्नानुसार आर्थिक सवलती द्याव्या.
खरेदी विक्रीचे व्यवहार बँक खात्यातूनच करावे, नगदी खरेदीवर आळा, खाजगी बँका, पतसंस्था, पोस्ट पेमेंट बँक खाते सर्व एकाच बँक खात्याला जोडले जावे. दरवर्षी होणारे आर्थिक व्यवहार बँकेच्या माध्यमातून व्हावे. घर, शिक्षण, आरोग्य, शेती, सोने, चांदी, गाडी, चैनीच्या वस्तू, हॉटेल, लॉज, प्रवास, कृषी साहित्य, सर्व ठिकाणी ऑनलाईन व्यवहारच सक्तीचे करावे, असेही त्यांनी सुचविले आहे.
 
 
'One person, one bank account'  ज्यामुळे खरेदी आणि विक्री जादा दराने होणार नाही. कोणीही कॅश पैसे देणार किवा घेणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही. आज सर्वसाधारण नागरिकांची सर्वच क्षेत्रात लूट होत आहे. ज्याच्या हातात अधिकार आहे तो सर्वसामान्य नागरिकांना लुटायलाच बसलेला आहे. यांचे कारण महणजे त्यांच्या पैशाच्या व्यवहारावर सरकारची नजरच नाही आहे, असेही ते म्हणाले. जोपर्यंत ‘एक व्यक्ती : एक बँक खाते’ होत नाही आणि सर्व व्यवहार ऑनलाईन होत नाहीत, तोपर्यत सर्वसामान्य नागरिकांची अशीच आर्थिक लूट केली जाईल आणि देशात गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढत राहील, असे सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक सचिन शिंदे म्हणाले.