दिल्ली उच्च न्यायालयाचा झुरळ जनता पक्षाला दिलासा

आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
cockroach janata party दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी 6 जून रोजी जंतर मंतर येथे होणाऱ्या झुरळ जनता पक्षाच्या प्रस्तावित आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेवर दाखल केलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
 

cockroach janata party 
उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे झुरळ जनता पक्षाच्या आंदोलनावर सध्या रोख लावण्यात आलेली नाही. अशा आंदोलनांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला होता. तथापि, न्यायालयाने याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज विचारात घेतली नाही आणि या संदर्भात कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला.
 
आवश्यक परवानग्या घेणे आवश्यक
दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे cockroach janata party  झुरळ जनता पक्षाला आपले प्रस्तावित आंदोलन पुढे नेण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी सर्व आवश्यक परवानग्या मिळवणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करणे आवश्यक आहे. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणी योग्य वेळी पुढील सुनावणीचा विचार केला जाईल.