रोहना उपसरपंच रवींद्र राऊत पायउतार

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
६ विरुद्ध २ मतांनी अविश्वास ठराव पारीत
 
मानोरा,
Rohna Deputy Sarpanch Ravindra Raut रोहना गट ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र रामराव राऊत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर झाला असून ६ विरुद्ध २ मतांनी ठरावाच्या बाजूने कौल मिळाल्याने राऊत यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. या निर्णयामुळे रोहना ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शयता आहे.
 
 
gram panchayat
 
तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार ५ जून रोजी सकाळी ११ वाजता रोहना ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच उपसरपंच रवींद्र राऊत यांनी अविश्वास ठरावावर गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली. त्यानुसार उपस्थित सदस्यांचे मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेनंतर अविश्वास ठरावाच्या बाजूने ६ तर विरोधात २ मते पडली. आवश्यक बहुमत मिळाल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला आणि रवींद्र राऊत यांची उपसरपंचपदावरून हकालपट्टी निश्चित झाली. यापूर्वी सरपंच प्रभावती सतीश देशमुख यांच्यासह सदस्य विमला तुकाराम मोहाडे, प्रीतम जयराम डोलारकर, ललिता मोतीराम पवार, मनीषा नितीन भारसाकडे व उषा किशोर शिंदे यांनी तहसीलदारांकडे लेखी अर्ज सादर करून विशेष सभा बोलावण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने विशेष सभेचे आयोजन केले होते.
 
 
Rohna Deputy Sarpanch Ravindra Raut  अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीतील सत्तासमीकरणे बदलण्याची शयता निर्माण झाली असून, नव्या उपसरपंच निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. रोहना ग्रामपंचायतीतील या घडामोडीकडे संपूर्ण मानोरा तालुयाचे लक्ष लागले होते. अखेर झालेल्या मतदानाने उपसरपंचपदावरील संघर्षाचा निकाल स्पष्ट झाला असून, आता नव्या नेतृत्वाची निवड कोणाच्या गळ्यात माळ घालते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.