सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे गंभीर आरोप

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
मुंबई
Sumi Ali अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा एका नव्या वादाच्या केंद्रस्थानी आले असून, त्यांच्या आयुष्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेल्या ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटामुळे कायदेशीर संघर्ष तीव्र झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती अमित जानी करत असून, सलमान खान यांच्या कायदेशीर टीमने निर्मात्यांना नोटीस बजावल्याने वादाला तोंड फुटले आहे.
 

Sumi Ali 
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान यांच्या वकिलांच्या टीमने चित्रपटाशी संबंधित कोणताही कंटेंट, पोस्टर्स किंवा टीझर्स तातडीने थांबवावेत, अशी मागणी करत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच निर्मात्यांनी लेखी स्वरूपात माफी मागावी, अशीही मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. हा चित्रपट सलमान खान यांच्या आयुष्यातील वादग्रस्त काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असल्याचा दावा केला जात असल्याने, घोषणा झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, चित्रपटाचे निर्मातेअमित जानी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत मोठा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सलमान खान यांच्या कायदेशीर टीमकडून आलेली नोटीस कॅमेऱ्यासमोर फाडताना दिसतात. या कृतीद्वारे त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांना सतत धमक्या मिळत असून, त्यांच्या मते त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या घडामोडींवर सलमान खान किंवा त्यांच्या कायदेशीर टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत सार्वजनिक वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या वादात पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणात Sumi Ali सलमान खान यांची माजी प्रेयसी सुमी अली हिने देखील उडी घेतली आहे. सोशल मीडियावर तिने अमित जानी यांच्या भूमिकेला समर्थन दर्शवत प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जे दोषी असतात ते धमक्यांचा आधार घेतात आणि लपण्याचा प्रयत्न करतात, असे तिने नमूद केले आहे. तसेच चित्रपट निर्मितीचा अधिकार असल्याचे सांगत तिने निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रात नव्या कायदेशीर चर्चांना सुरुवात झाली असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीगत गोपनीयता यांच्यातील सीमारेषा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पुढील घडामोडींवर या वादाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.