वयाच्या 45 व्या वर्षी संभावना सेठ बनली जुळ्या बाळांची आई

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
मुंबई
Sambhavna Seth भोजपुरी आणि दूरचित्रवाणी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री संभावना सेठ हिच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. वयाच्या 45 व्या वर्षी संभावना सेठ आई बनली असून तिच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. या आनंदाची बातमी अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
 
 

Sambhavna Seth  
संभावना सेठ आणि अभिनेता अविनाश द्विवेदी यांनी 2016 मध्ये विवाह केला होता. लग्नानंतर गेल्या दहा वर्षांपासून हे दाम्पत्य पालकत्वाच्या प्रतीक्षेत होते. अनेक प्रयत्नांनंतर अखेर त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला असून जुळ्या बाळांच्या आगमनाने त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भावनिक पोस्ट शेअर करत ही आनंदवार्ता दिली. “लक्ष्मी और गणेश दोनों घर आ गये...” असे शब्द लिहित तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही या दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मातृत्वाचा प्रवास संभावना Sambhavna Seth  सेठसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला होता. आई होण्यासाठी तिने अनेक वेळा आयव्हीएफ (IVF) उपचारांचा आधार घेतला होता. मात्र, गर्भधारणा झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात गर्भपात झाल्याने तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. या कठीण प्रसंगानंतरही तिने हार मानली नाही आणि पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.सततच्या अपयशानंतर संभावना आणि अविनाश यांनी सरोगसीचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांच्या संयम, आशा आणि प्रयत्नांना यश मिळाले असून त्यांच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. या आनंददायी घटनेमुळे दोघांच्याही आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.संभावना सेठच्या मातृत्वाच्या या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली असून तिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. दशकभराच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झालेले हे स्वप्न अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरणार आहे.