आ. कुणावार यांनी ३ महिन्यात शब्द पूर्ण
समुद्रपूर,
Sameer Kunawar तालुयातील वाघेडा-लसनपूर रस्त्यावरील पूल मागीलवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचून त्याची अत्यंत दैनावस्था झाली होती. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाघेडा ग्रापंच्या वतीने आ. समीर कुणावार यांच्याकडे ठरावातून करण्यात आली होती. मागणीची तत्काळ दखल घेत आ. कुणावार यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्याला पुलाची पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आ. कुणावार यांच्या प्रयत्नाने पुलाचे बांधकाम अवघ्या तीन महिन्यात पूर्ण झाले असून त्यांनी दिलेला शब्द पाळल्याच्या भावना गावकर्यांनी व्यत केल्या.
वाघेडा गावाला मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी लसनपूर-वाघेडा हा एकमेव मार्ग आहे. मागीलवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गावरील पुलाची परिस्थिती अत्यंत खराब झाल्याने या मार्गावरून वाहने काढणे कठीण झाले होते. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, असा ठराव वाघेडा ग्रापंच्या वतीने घेण्यात आला. २५ ऑटोबर २०२५ रोजी आ. कुणावार यांना निवेदन दिले. मागणीची दखल घेत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांला पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. येणार्या पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. आ. कुणावार यांनी दिलेला शब्द पूर्ण करीत पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला आणि पुलाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या रस्त्याने जाणार्या येणार्यांची समस्या दूर झाली. वाघेडा येथील सरपंच अमोल मसराम, उपसरपंच रवींद्र ठोंबरे, ग्यानी शिरोडे, होमराज आराडे यांनी समाधान व्यत केले.