२५ हजाराची स्वीकारली लाच
मालेगाव,
Sarpanch caught in ACB trap एकीकडे ’मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत गावाला आदर्श म्हणून गौरवण्याची प्रक्रिया सुरू होती, तर दुसरीकडे त्याच आदर्श ग्रामपंचायी ढोरखेडा येथील सरपंच सुनीता दत्तात्रय उर्फ बबन मिटकरी यांना ४ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजता, २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाशीम एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) च्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
Sarpanch caught in ACB trap प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणार्या कामात कमिशन म्हणून २५ हजार रुपयांची मागणी सरपंचाने केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून ३ जून रोजी दुपारी पडताळणी केली. विशेष बाब म्हणजे यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एक उच्चस्तरीय चमु या आदर्श ग्रामपंचायतच्या कामकाजाची तपासणी करत असताना येथील महिला सरपंचास ४ जून रोजी अटक केली. एकीकडे आदर्श कारभाराचे मूल्यमापन सुरू असतानाच, दुसरीकडे सरपंच लाच घेताना पकडल्या गेल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणावरूनआदर्श ग्रामपंचायत चा बुरखा टराटरा फाटला असून, शासकीय योजनेच्या तपासणी पथकासमोरच महिला सरपंचाला २५ हजारांची लाच घेताना शिरपूर पोलिसांनी आणि एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.