लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
गर्भवती राहिल्याने प्रकार उघड, नराधम गजाआड
वणी पोलिसांची धडक कारवाई

वणी, 
Sexual assault on a minor girl प्रेमसंबंधाचा बहाणा करून आणि लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वणी परिसरात उघडकीस आली आहे. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी 7 महिन्यांची गर्भवती असून, तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी तत्परता दाखवत 20 वर्षीय नराधम आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.
 
 
Atykachar
 
वणी शहरातील प्रथम बोटलावार (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. आरोपी बोटलावार आणि वणी शहरातीलच 17 वर्षीय पीडित मुलीची 5 वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. याचाच गैरफायदा घेत आरोपीने मुलीचा विश्वास संपादन केला आणि तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनंतर पीडित मुलीमध्ये शारीरिक बदल दिसून आल्याने तिच्या पालकांना संशय आला. पालकांनी मुलीला प्रेमाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने रडत रडत हा धक्कादायक प्रकार सांगितला. आपली मुलगी 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे समजताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
 
 
Sexual assault on a minor girl  घाबरलेल्या पालकांनी या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तातडीने मुलीला घेऊन गर्भपातासाठी रुग्णालय गाठले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने तपासणी केली असता मुलगी अवघ्या 17 वर्षांची (अल्पवयीन) असल्याचे समोर आले. कायद्यानुसार हे प्रकरण गंभीर असल्याने डॉक्टरांनी व रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती विनाविलंब वणी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वणी पोलिसांनी तत्काळ आरोपी प्रथम बोटलावार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वणी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, वणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.