शैलेश अग्रवाल काँग्रेसमधून निलंबित

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर,
Shailesh Aggarwal वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थनिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणूकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षामधून निलंबीत करण्यात आले असून, त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आले. याबाबत कॉग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश पाटील यांनी, अग्रवाल यांना पाठविलेल्या पत्रात, आपल्या विनंतीवरून विधान परिषद निवडणुकीसाठी आपणास वर्धा चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली होती.
 
 
Shailesh Aggarwal
 
Shailesh Aggarwal मात्र आपण पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेऊन आपली उमेदवारी मागे घेतली व पक्षासमोर अडचणी निर्माण केल्यात, ही बाब अत्यंत चुकीची असून, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबीत करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी निवडणूकीतून माघार घेत पक्षातीलच काही नेत्यांनी भाजपाला मदत केल्याचा आणि मतदारांमध्ये पैशांचे वाटप झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे निवडणूक लढण्याआधीच काँग्रेसवर पराभावाची नामुष्की ओढावली. अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनीही आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने भाजपा महायुतीचे उमेदवार अरूण लाखानी यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला.