पत्नी नांदायला येत नसल्याने युवकाचे टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
काळीदौलत, 
'Sholay style' Andolan पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून घोणसरा येथील एका युवकाच्या गुरुवार, 4 जून रोजी दुपारी काळीदौलत येथील मोबाईल टॉवरवर चढून केलेल्या ‘शोले स्टाईल’ आंदोलनाने परिसरात एकच खळबळ उडाली. या युवकाने काही महिन्यांपूर्वी गावातीलच एका युवतीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता.
 
 
shole
 
'Sholay style' Andolan  मात्र त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिला परत माहेरी नेले. तेव्हापासून युवती माहेरीच राहत असल्याने आणि पत्नी नांदायला येत नसल्यामुळे युवक मानसिक तणावात होता. याच कारणातून त्याने हे आंदोलन सुरू केले. ही माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ समजूत काढल्यानंतर युवकाला सुरक्षित खाली उतरवले. या प्रकारामुळे बराचकाळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.