वर्धेत सजली होती मैफल जुन्या आठवणींना दिला उजाळा
वर्धा,
Suman Kalyanpur आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजाने रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणार्या सुमन कल्याणपूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. २४ एप्रिल २०१६ रोजी जय महाकाली शिक्षण संस्था वर्धा व सृजन म्युझिकल द्वारा आयोजित कार्यक्रमात त्यांची मैफल रंगली होती. अशा या गोळ गळ्याच्या गायिकेला जीवंत असतानाच भारतरत्न देणे अपेक्षित होते. परंतु, तो मिळला नाही. आता मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या संगीत साधणेचा सन्मान करावा, अशी मागणी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केली आहे.
Suman Kalyanpur सुमन कल्याणपूर यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये अजरामर गाणी गायली आहेत. ’ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’, ’तुमने पुकारा हम चले आए’ आणि ’आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ ही त्यांची प्रसिद्ध गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात जगतात. केंद्र सरकारने त्यांना २०२३ मध्ये ’पद्मभूषण’ या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुमन कल्याणपूर या भारतीय संगीत विश्वाच्या अनमोल रत्न होत्या. त्यांच्या आवाजातील श्रद्धा, भती आणि शास्त्रीय-सांगीतिक निपुणता यांनी अनेक दशकांपासून विविध भाषिक आणि सांस्कृतिक पृष्ठभूमीतील लोकांना एकत्र केले. त्यांचे अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या योगदानामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाची प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली आहे आणि त्यांनी देशाचा सांगीतिक गौरव बरेचदा उंचावला आहे. सुमन कल्याणपूर यांना मरणोत्तर भारत रत्नाने सन्मानित करणे देशाच्या सांस्कृतिक परंपरेला न्याय देणारे आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे ठरेल, अशी मागणी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी प्राचार्य फोरमद्वारे सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आयोजित कार्यक्रमात बोलत होते.