विदेशी पाळीव कुत्र्यांवर कर लावा

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुपची नपला मागणी
 
हिंगणघाट,
Tax on exotic dogs हिंगणघाट शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नगरपालिकेतर्फे नसबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु, दुसरीकडे काही नागरिक मोठ्या प्रमाणात विदेशी जातीचे कुत्रे प्रजनन केंद्रांतून आणून पाळत आहेत त्यामुळे सुद्धा शहरात कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्या विदेशी कुत्र्यांच्या मालकांवर नगर पालिकेने कर लावावा अशी मागणी, निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुपने केली आहे. निवेदनात नमुद केल्यानुसार, शहरात काही कुटुंबांमध्ये पाच ते सहा विदेशी कुत्रे पाळले जात आहे. त्यामुळे भारतीय देशी कुत्र्यांना दत्तक घेण्याचे प्रमाण कमी होत आहे. विदेशी जातीचे कुत्रे पाळणार्‍या नागरिकांकडून वार्षिक कर आकारण्यात यावा व त्या निधीचा वापर देशी कुत्र्यांच्या संगोपन, लसीकरण व निवारा व्यवस्थेसाठी करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

dog
(संग्रहित छायाचित्र)
 
Tax on exotic dogs काही नागरिकांकडे पिटबुलसारख्या आक्रमक व धोकादायक जातींचे कुत्रे पाळले जात आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यन्त धोकादायक आहे. ज्यांना सायबेरियन हस्की पोसायचा आहे त्यांनी सायबेरियात जाऊन राहावे आणि पोसावे. भारतात लोकांनी भारतीय कुत्रे पोसावे हेच अपेक्षित आहे हा देश भारतीय कुत्र्यांचा सुद्धा आहे. काही शिकलेले लोक विदेशी कुत्र्यांना संडासकरिता बाहेर आणतात त्यावरून लोकांनमध्ये भांडणे होतात घाण पसरते. नगरपालिकेचा उद्देश मोकाट व देशी कुत्र्यांना संरक्षण व निवारा उपलब्ध करून देणे हा असावा. अन्यथा नसबंदी मोहिमेमुळे नगर पालिका देशी कुत्र्यांचा प्रजाती संपवण्याचा प्रयत्न करीत आहे असा गैरसमज होण्याची शयता आहे.