कांगपोकपी,
houses torched in Manipur मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील लोइबोल खुलेन गावात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून सात घरे जाळून खाक करण्यात आली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास काही संशयित सशस्त्र हल्लेखोरांनी गावात प्रवेश करून घरात झोपलेल्या नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात लेतखोंगम हाओकिप, त्यांची पत्नी तिनमेरी हाओकिप आणि जांगमिनलाल हाओकिप यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर सात घरे पेटवून देण्यात आली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले.

या घटनेनंतर कुकी समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी तीव्र निषेध नोंदवत हा हल्ला निष्पाप नागरिकांवरील अमानुष हिंसा असल्याचे म्हटले आहे. काही संघटनांनी नागा बंडखोर गटांवर आणि संबंधित सशस्त्र संघटनांवर या हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. houses torched in Manipur गेल्या काही वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या मैतेई आणि कुकी-झो समुदायांमधील संघर्षानंतर राज्यात सातत्याने हिंसाचार, जाळपोळ आणि विस्थापनाच्या घटना घडत आहेत. या अशांततेत आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि हजारो लोकांचे स्थलांतर झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घटनेमुळे मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली असून सुरक्षा यंत्रणांवर मोठे आव्हान उभे राहिले आहे.