नागपूर,
Tree plantation by the Mahapor जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिटणीस नगर येथे वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी संकल्प करण्यात आला.
निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. यावेळी महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, दिव्या धुरडे, नेहरूनगर झोन सभापती सीमा ढोमणे, नगरसेवक पिंटू झलके, नगरसेविका मंगला गवरे, क्रिकेटपटू प्रफुल हिंगे, पर्यावरण वक्ते राज मदणकर, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर राऊत, विजय आसोले, तिरळे कुणबी समाज संस्थेचे सचिव सुरेश जिचकार, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: अंशुल जिचकार, संपर्क मित्र