पुलाचे कठडे तोडून ट्रक नदीपात्रात

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
अचलपूर, 
Truck accident अचलपूर शहरातील मंजूरपुरा येथील खान ब्रीक्स सप्लायर्सच्या ट्रकचा त्रिवेणी संगम तोंडगाव येथे भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी ५ जूनला सकाळी घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाचे कठडे तोडत थेट नदीपात्रात कोसळला.
 
 
ACCCDKASDI
 
प्राप्त माहितीनुसार, अचलपूर येथील मंजूरपुरा परिसरातील खान ब्रीक्स सप्लायर्सचा ट्रक विटा आणण्यासाठी अचलपूरहून चांदूरबाजारच्या दिशेने जात होता. ट्रकमध्ये मंजूरपुरा व बेगमपुरा परिसरातील रहिवासी समीर बेग तमीज बेग, शेख समीर शेख जमीर आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद हफीज हे नेहमीप्रमाणे कामासाठी प्रवास करत होते. सकाळच्या सुमारास ट्रक तोंडगावजवळील त्रिवेणी संगम परिसरातील पुलावर पोहोचला असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने प्रथम पुलाच्या कठड्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की पुलाचे कठडे तुटून ट्रक थेट खाली नदीपात्रात जाऊन कोसळला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात पडलेल्या ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. या भीषण अपघातात बेगमपुरा निवासी समीर बेग तमीज बेग (वय ३०) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर मंजूरपुरा निवासी शेख समीर शेख जमीर आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद हफीज हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
 
Truck accident  घटनेची माहिती मिळताच परतवाडा ठाणेदार सुरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी उमेश सावरकर, गोपाल झटाले, सुधीर राऊत, सचिन कोकणे, पियुष वानखडे आणि विराज ठाकूर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य केले. जखमींना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले .