नागपूर,
vishwa-mangalya-sabha : विश्वमांगल्य सभेची द्विदिवसीय वार्षिक केंद्रीय बैठक वसंतराव नाईक सभागृहात (वनामती) उत्साहपूर्ण वातावरणात झाली. देशातील 21 प्रांतांतील 150 दायित्वधारी कार्यकर्त्या तसेच विश्वमांगल्य सभेच्या विविध कार्यविभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आगामी वर्षातील विविध कार्यक्रम, उपक्रम व संघटनात्मक विस्ताराचे वार्षिक नियोजन करण्यात आले.
बैठकीचे उदघाटन विश्वमांगल्य सभेचे सभाचार्य जितेंद्रनाथ महाराज तथा सभाचार्या रेणुका माई यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अ. भा. अध्यक्ष रेखादेवी खंडेलवाल, अ. भा. मार्गदर्शक प्रशांत हरताळकर, अ. भा. संघटन मंत्री डॉ. वृषाली जोशी यांनी मार्गदर्शन केले.
युगानुकुल मातृत्व - काळाची गरज, परिवार विशेषतः मातृशक्तीची भूमिका, आदर्श मातृत्वासाठी आवश्यक व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेक विषयांवर विचार मंथन, व्यासपीठीय मार्गदर्शन प्राप्त झाले. अ. भा. व प्रांतस्तरीय दायित्वांची फेररचना व घोषणा करण्यात आली. सलग नऊ वर्षे अ. भा. अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केलेल्या रेखादेवी खंडेलवाल यांचे दायित्व बदल करण्यात आले असून विश्वमांगल्य ट्रस्टच्या कार्याध्यक्ष म्हणून त्या कार्यभार सांभाळणार आहेत. नलिनी हावरे (मुंबई) यांनी नव्या अ. भा. अध्यक्ष म्हणून दायित्व स्वीकारले.
अ.भा. स्तरावरील विविध दायित्व घोषणाही करण्यात आल्या. त्यामध्ये बबिता हर्ष मल्होत्रा (दिल्ली), प्रियंका शुक्ला (लखनऊ) व सूरज डामोर (मध्य प्रदेश) यांची अ. भा. उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. योगिनी पांडे (नागपूर) यांची अ. भा. सचिव, बी. श्रुती (भाग्यनगर) व आनंदप्रभा सिंह (काशी) यांची अ. भा. सह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पूजा नरेडी (भाग्यनगर) यांची अ. भा. कोषाध्यक्ष, कीर्ती पातूरकर (नागपूर) अ. भा. सह कोषाध्यक्ष, पूजा पाठक अ. भा. संपर्क प्रमुख, दीपाली शर्मा (जम्मू)सह संपर्क प्रमुख, अनिता चौधरी (दिल्ली) प्रचार-प्रसार प्रमुख, रसिका देव यांची प्रचार-प्रसार सह प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विश्वमांगल्य स्वनाथ परिषद संयोजिका म्हणून अंजली देव, संचालक म्हणून नीरज चौधरकर, समन्वयक पल्लवी कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. जनप्रतिनिधी मातृसभा सचिवपदी शुभांगी मेंढे, विश्वमांगल्य छात्र सभेच्या अ. भा. उपाध्यक्षपदी माधवी शिंदे (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली.