वर्धा :
Wardha : Shailesh Aggarwal वर्धा- चंद्रपूर -गडचिरोली या तीन जिल्ह्या मिळून होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काल ४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. आज पाच रोजी काँग्रेस प्रदेश समितीने अग्रवाल यांना निलंबित करण्याचे पत्र काढले. दरम्यान अग्रवाल यांनी आपणच काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे.
अग्रवाल यांनी जाहीर केलेल्या खुलास्या नुसार निलंबित करन्यापेक्षा निष्कासीत करायला पाहिजे होतं. हे पत्र म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा यापेक्षा जास्त काहीच नाही. मी निलंबन माघारी घेण्याची विनंती स्वपक्षाची मतं आपल्या उमेदवाराला मिळवून देन्याऐवजी विरोधकांना विकणाऱ्या या निर्लज्ज लोकांपुढे करणार नाही. पक्षत्याग करत असल्याचे जाहीर करतो, असे शैलेश अग्रवाल यांनी कळवले आहे.