Weather Maharashtra राज्यात 6 जून रोजी हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असून भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी उष्णता आणि पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि मुंबई या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट—, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 22 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता आणि पावसाचा दुहेरी परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
Weather Maharashtra कोकण विभागात हवामानाचा मिश्र परिणाम दिसून येणार आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने या तीन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Weather Maharashtraउत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसाठी कोणताही अधिकृत अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Weather Maharashtra पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जना, वादळी वारे आणि पावसाच्या सरींचा प्रभाव दिसून येऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट नसला तरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता कायम आहे.
Weather Maharashtra विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अल्प कालावधीत जोरदार सरीही कोसळू शकतात.