पर्यावरण दिनानिमित्त बालकांचा प्रेरणादायी उपक्रम

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नागपूर,
World Environment Day जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हावरापेठ परिसरात एक सुंदर उपक्रम राबविण्यात आला. उन्हाळी सुट्टीत आजींकडे आलेल्या स्मित चकोले या बालकाने पहाटे उठून कुंडीतील रोपट्याच्या भोवतीची माती सैल करून त्यात शेणखत टाकले आणि पाणी घालून झाडांची काळजी घेतली.
 

nono 
 
 
या उपक्रमातून पर्यावरण संतुलन राखण्याचा संदेश देण्यात आला. सोसायटीतील इतर मुलांनीही किमान एक झाड लावून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.World Environment Day “निसर्ग जपा, जीवन फुलवा” असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यात स्मित चकोले याला माधुरी मेहर व वैष्णवी मेहर यांनी सहकार्य केले.
सौजन्य : रमेश मेहर,संपर्क मित्र