देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांची विहंगम व थरारक प्रात्यक्षिके

कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समारोप

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
volunteer-demonstrations : कार्यकर्ता विकास वर्गात सहभागी देशभरातील तरुण संघ स्वयंसेवकांच्या काल सायंकाळी रेशीमबाग मैदानावर विहंगम व थरारक प्रात्यक्षिके सादर केली. विशेषतः घोष पथकाच्या वादनामुळे उपस्थित प्रख्यात उद्योगपती व इतर मान्यवर भारावून गेले. विविध स्वदेशी रचना मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या.
 
 
 
04june0164
 
 
 
रा.स्व. संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप आज झाला. देशभरातील 800 तरुण यात सहभागी झाले होते. प्रख्यात उद्योगपती कुमारमंगलम बिरला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय पद्मश्री भारतभूषण त्यागी, पद्मश्री सत्यनारायण नुवाल, योगी भावनाथ महाराज, महाराजा गजसिंह, गोपाळभाई मावजी गोरसिया, दिव्यम त्रिपाठी, गोविंद मावजी गोरसिया, भार्गवभाई सुथार, महापौर नीता ठाकरे तसेच नगरसेवक-नगरसेविका, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
वर्गात सहभागी शिक्षार्थी समारोपात विविध प्रात्यक्षिके सादर करतात. यंदाही प्रारंभी भगव्या ध्वजाला संचलनाने मानवंदना देण्यात आली. घोषाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन या स्वयंसेवकांनी केले. यानंतर नियुद्ध, दंड व्यायामयोग, आसन आदी प्रात्यक्षिके झाली. ही प्रात्यक्षिके सादर करताना या स्वयंसेवकांनी निपुणता, सांघिकता व अचुकतेचे दर्शन घडविले. यातील काही रचना न थांबता दीड-दोन मिनिटांची होती. तरीही संतुलन राखत अचुकता साधली. यानंतर घोष पथकाची प्रात्यक्षिके झाली. पहाटे 4 वाजता उठल्यानंतर सकाळी साडेसात वाजेपर्यंत शारीरिक, दिवसा बौद्धिक, सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पुन्हा शाखा व शारीरिक कार्यक्रम होतात. यानंतर घोष शाखा लागते. त्यात विविध वाद्ये शिकवली जातात.
 
 
इतर प्रात्यक्षिकांबरोबरच विविध वाद्ये शिकलेल्या स्वयंसेवकांचे हे घोष पथक असते. या घोष पथकाने विविध स्वदेशी रचनांवर वादन केले. स्थिर व संचलन अशा दोन्ही स्थितीत अचुक वादन करणे सोपे नसते. त्यातही शंकराची पिंड, सोमनाथ मंंदिराच्या आकारात स्थिर वादन झाले. यानंतर वंदेमातरमचे वादन 150 आकड्याच्या रचनेत सादर केले. या अप्रतिम वादनाने उपस्थित मान्यवर मंत्रमुग्ध झाले.