अनिल कांबळे
नागपूर ,
woman commits suicide पती आणि सासूच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

मृत महिलेचे नाव अंकिता नितीन डांगसे (२८) असे असून ती हुडकेश्वर खुर्द येथील अंबिका ले-आऊट परिसरात राहत होती. नितीन नामदेवराव डांगसे (वय ३४) व त्याची आई पार्वतीबाई नामदेवराव डांगसे (६०) हे आरोपी आहेत. अंकिता हिचा विवाह नितीन डांगसे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू असले तरी पुढे पती आणि सासूकडून तिला विविध कारणांवरून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. किरकोळ कारणांवरून वाद घालणे, सतत मानसिक दबाव टाकणे आणि छळ करणे यामुळे अंकिता तणावाखाली होती.woman commits suicide या छळाला कंटाळून अंकिताने अखेर आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. तिचे वडील सुनील मंगल पेदुलवार (५८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला व नितीनला अटक केली असल्याची माहिती ठाणेदार अनामिका मिर्झापुरे यांनी दिली.