तिळ पहिल्याच दिवशी ११ हजार ३५० रुपये

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
सेलू उपबाजारात तीळ लिलावाचा शुभारंभ
६१ शेतकर्‍यांचा सहभाग
 
सिंदी (रेल्वे)/सेलू, 
Agricultural Produce Market Committee कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी अंतर्गत येत असलेल्या सेलू उपशाखेमध्ये शनिवार ६ रोजी तीळ शेतमालाच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी या लिलावाला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तिळाला १० हजार ५०० रुपये ते उच्चांकी ११ हजार ३५० रुपये प्रति विंटल भाव मिळाला. सेलू उपशाखेतील कापूस यार्डमध्ये या लिलाव प्रकि‘येचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगारे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. या लिलाव प्रसंगी विक‘म जयस्वाल, रामनारायण पाठक, नरेंद्र अग‘वाल, मनोज जगताप, अमोल उमाटे आदी उपस्थित होते. अडते व व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या शेतमालाला योग्य व जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही या प्रसंगी दिली.
 
 
til
 
बाजार समितीचे सचिव महेंद्र भांडारकर यांनी कार्यक‘माची रूपरेषा मांडली. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी परिसरातील ६१ शेतकर्‍यांनी तीळ विक्रीसाठी आणून या प्रकि‘येत सहभाग नोंदवला. याप्रसंगी बाजार समितीच्या वतीने पहिल्या दिवशी माल आणणारे शेतकरी पांडुरंग फटींग (रा. घोराड), बळवंत तडस यांच्यासह तीळ उत्पादक शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शेतकरी नेते सुदाम पवार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच बाजार समितीचे संचालक व सदस्य काशिनाथ लोणकर, गुणवंत कडू, संजय काकडे, सतीश धोपटे, वरुण दप्तरी, मनोज तामगाडगे, गोपाल कोपरकर आदी उपस्थित होते. शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवून देणे व अधिक सुख सोयी उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे मत समिती सदस्य रेणुका कोटंबकर यांनी व्यत केले.
 
 
Agricultural Produce Market Committee  परिसरातील तीळ उत्पादक शेतकर्‍यांना आपला माल घेऊन यवतमाळ किंवा इतर खाजगी बाजारात जावे लागू नये म्हणून आम्ही ही व्यवस्था सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांनी दाखवलेला विश्वास आणि व्यापार्‍यांनी दिलेला ११,३५० रुपयांचा उच्चांकी भाव हे या योजनेचे यश आहे. बाजार समितीत पारदर्शक व्यवहार व्हावा, माल अचूक मोजला जावा आणि उघड्या लिलाव पद्धतीने योग्य भाव मिळावा हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापुढेही दर शनिवारी तिळाचा आणि सोमवारपासून भुईमुगाचा लिलाव होणार असून, शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त सं‘येने आपला स्वच्छ केलेला माल येथेच विक्रीसाठी आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीचे सभापती केशरीचंद खंगारे यांनी केले आहे. दर शनिवारी तिळाचा लिलाव सेलू उपशाखेच्या गोदाम १ मध्ये घेतला जाईल. शेतकर्‍यांनी आपला तीळ शेतमाल चांगला वाळवून आणि स्वच्छ करून आणावा, असे आवाहन करण्यात आले.