बायसिकल असोसिएशन, आयएमए व पिट इंडिया मोमेंट तर्फे उपक्रम
भंडारा,
Bicycle Rally बायसिकल असोसिएशन भंडारा, आयएमए भंडारा व पिट इंडिया मोमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार, 7 जून रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त भंडारा शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या उत्साहात शेकडो सायकलपटूंनी सहभाग घेत प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश दिला.
बायसिकल असोसिएशन भंडारा तर्फे दरवर्षी बायसिकल रॅलीचे आयोजन केले जाते. यंदा फिट इंडिया मोमेंट यांच्या संयुक्त विद्यमानातून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोबतीने 7 जून रोजी भव्य बायसिकल रॅली घेण्यात आली. यामध्ये एकूण 178 सायकलपटूंनी नाव नोंदणी केली होती, त्यापैकी 140 लोकांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. या सायकल रॅलीद्वारे प्रदूषण व प्लास्टीक मुक्त पर्यावरण, इंधनाची बचत अशा सामाजिक मुद्यांवर सायकलपटूंनी आपल्या सायकलवर संदेश लावून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
Bicycle Rally या सायकल रॅलीकरिता फिट इंडिया मोमेंटचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी वैशाली गोमकाळे, आयएमए चे अध्यक्ष डॉ.प्रदीप मेघरे, सचिव डॉ. दुर्गेश पशीने व बायसिकल असोसिएशन भंडारा चे अध्यक्ष पंकज हरडे, अमेय डोंगरे, गौरव सेलोकर, अमोल मानापुरे तसेच अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्राचे पियुष ठवरे यांचे सहकार्य लाभले.