चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कची दुरावस्था

महानगरपालिकेचे दुर्लक्ष ?

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
नागपूर ,
Children's Traffic Park नागपूर शहरातील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, येथे लहान मुलांसाठी असलेली सुविधा आणि सुरक्षित शिक्षण व्यवस्था पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याचे दिसत आहे.या पार्कमध्ये असलेली ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा, रस्त्यांची स्थिती आणि इतर सुविधा अनेक ठिकाणी तुटलेल्या व खराब अवस्थेत आढळत आहेत. परिणामी, मुलांना ट्रॅफिक नियम शिकण्यासाठी असलेले हे महत्त्वाचे ठिकाण आता अव्यवस्थेचे उदाहरण बनले आहे.
 

park 
 
 
स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, “मुलांच्या शिक्षणासाठी असलेला हा पार्कच जर सुरक्षित नसेल, तर प्रशासन काय करत आहे?”Children's Traffic Park असा सवाल उपस्थित केला जात आहे.महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सौजन्य:मंगेश ठोसर,संपर्क मित्र