भुवनेश्वर
Biggest Raid ओडिशामध्ये भ्रष्टाचाराविरोधात एक अत्यंत मोठी आणि धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. कंदामाल जिल्ह्यातील बालिगुडा येथील ‘आयटीडीए’चे सहाय्यक कार्यकारी अभियंता बैकुंठनाथ बेहेरा यांच्या मालमत्तेवर ‘ओडिशा व्हिजिलन्स’ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) ने एकाच वेळी नऊ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत बेहेरा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक लॉकरमधून तब्बल 2 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण ओडिशात एकच खळबळ उडाली आहे.
Biggest Raid बैकुंठनाथ बेहेरा यांनी आपल्या उत्पन्नाच्या अधिकृत स्रोतांपेक्षा कोट्यवधी रुपयांची अवैध मालमत्ता जमा केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेत भुवनेश्वरमधील विशेष व्हिजिलन्स न्यायालयाने वॉरंट जारी केले. या वॉरंटच्या आधारे भुवनेश्वर, बालासोर, जाजपूर आणि बालिगुडा येथील 9 वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या मोहिमेत लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक आणि मोठ्या संख्येने कर्मचाèयांचा ताफा सामील झाला होता.
Biggest Raid 5 आलिशान इमारती आणि 13 प्राइम प्लॉट्सचा शोध
तपास अधिकाèयांनी दिलेल्या माहितीनुसार या छाप्यादरम्यान अभियंता बेहेरा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या 5 बहुमजली इमारतींचा शोध लागला आहे. यामध्ये भुवनेश्वरमधील निलाद्री विहार परिसरात असलेल्या सुमारे 10,500 स्क्वेअर फूट जागेवरील एका चार मजली टोलेजंग इमारतीचा समावेश आहे. याशिवाय भुवनेश्वर आणि जाजपूर जिल्ह्यात इतर चार निवासी मालमत्तांचाही शोध लागला आहे.