वर्धा,
Crime हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत शारीरिक व मानसिक छळासोबतच पत्नीचे आक्षेपार्ह फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल केल्या प्रकरणी पीडितेच्या पतीसह ५ जणांविरुद्ध ६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय पीडितेने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच पती आणि सासरच्या मंडळींकडून पीडितेला पैशांसाठी तगादा सुरू झाला.
Crime तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. याबाबत तिने माहेरच्या नातेवाईकांना माहिती दिली होती. पण तिची समजूत काढून संसार टिकवण्याचा स‘ा देण्यात आला. तरीही सासरकडील अत्याचार थांबले नाहीत. सासरच्यांनी तिला मारहाण केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीतून केला आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी पतीने तिला तिच्या भावाच्या घरी सोडले. तेव्हापासून त्याने पत्नीला परत नेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. यावरच न थांबता, पतीने पत्नीसोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो काही नातेवाईक आणि मित्रांना व्हायरल केल्याचे तक‘ारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अखेर ६ जून रोजी तिने हिंगणघाट पोलिस ठाणे गाठून तक‘ार नोंदविली. पोलिसांनीही तक‘ारीची दखल घेत पीडितेच्या पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.