आगीत डेलीनीड्स जळून खाक
वडनेर,
येथील संविधान चौक परिसरात असलेल्या Fire at DailyNeeds store डेलीनीड्स या दुकानाला आग लागली. त्यात ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. बहिणीच्या लग्नासाठी काढूण ठेवलेली ५० हजार रुपयांची रोख जळून खाक झाली. ही घटना आज ७ रोजी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संविधान चौकात हेमंत भोयर यांचे डेलीनीड्स आहे. दुकानाला आग लागली यात घरच्या लग्नाच्या कामासाठी आलेले सिलेंडर दुकानात ठेवून होते.
Fire at DailyNeeds store आग लागल्याने सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीत दुकानातील २ फ‘ीज, कुलर, शितपेय व पाण्याच्या बॉटल्स आणि इतर सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. यात जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हेमंत भोयर यांच्या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह याच दुकानावर अवलंबून आहे. एका महिन्याने त्याच्या बहिणीचे लग्न असून लग्नाच्या खर्चासाठी त्याने दुकानात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकडही या आगीत जळून खाक झाली आहे.