नवी दिल्ली
Forbes report Adani अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी एका महिन्यानंतर पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आलेल्या जोरदार तेजीनंतर त्यांची एकूण संपत्ती वाढून 90 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 8.55 लाख कोटी रुपये झाली आहे.
Forbes report Adani या वाढीमुळे त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि सॉफ्टबँकचे सीईओ मासायोशी सन यांना मागे टाकले आहे. मासायोशी सन यापूर्वी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, परंतु त्यांच्या जपानी गुंतवणूक फर्मच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे ते मागे पडले.
Forbes report Adani अदानींनंतर दुसèया क्रमांकावर मुकेश अंबानी (88.8 अब्ज डॉलर) आणि तिसèया क्रमांकावर मासायोशी सन (87 अब्ज डॉलर) आहेत. गौतम अदानी यापूर्वी एप्रिल-2026 मध्येही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते.
Forbes report Adani गेल्या महिन्यात अमेरिकन न्याय विभागाने अदानी समूहाविरुद्ध फसवणुकीचे आरोप फेटाळल्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत सुमारे 94.95 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी, समूहावर सौर ऊर्जा पुरवठा करारांसाठी 25 कोटी डॉलरची लाचखोरी केल्याचा आरोप होता, ज्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करत नव्हते.
Forbes report Adani त्यापूर्वीही, 2023 मध्ये अमेरिकन शॉर्ट-सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठ्या फसवणुकीचा आरोप केला होता, ज्यामुळे शेअर्स कोसळले होते. मात्र, गेल्या वर्षी नियामकांनी हे आरोप ‘सिद्ध होऊ शकले नाहीत’ असे म्हणत फेटाळून लावले होते.
Forbes report Adani जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानी 23व्या स्थानावर
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीश यादीनुसार, गौतम अदानी सध्या जगातील 23 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुकेश अंबानी आणि मासायोशी सन यांचा क्रमांक लागतो. शुक्रवारी अदानी जगातील दुसरे सर्वाधिक कमाई करणारे श्रीमंत व्यक्ती ठरले, ज्यांची संपत्ती एकाच दिवसात 23.74 हजार कोटी रुपयांनी वाढली. या यादीत पहिल्या क्रमांकावर दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट होते, ज्यांच्या नेटवर्थमध्ये शुक्रवारी 28.49 हजार कोटी रुपयांची वाढ झाली.