मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; ५ कोटींचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
मुंबई,
gold-smuggling-racket : भारताच्या अर्थकारणाचे केंद्र म्हणून मुंबईला ओळखले जाते. दैनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल मुंबईत होत असते. यामुळे अनेकदा अवैध धंदे, तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीच्याही माध्यमातून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पाहायला मिळते. त्यात सोन्याची तस्करी सुद्धा एक भाग असून मुंबई पोलीस आणि विमानतळ पोलीस अधिकाऱ्यांसाठी ही तस्करी रोखणे मोठे आव्हान असते. पण नुकतंच 'ओपेशन गोल्डेन नेक्सस'च्या माध्यमातून महसूल गुप्तचर विभागाकडून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) मुंबईमध्ये सुरु असलेल्या तस्करीला थांबवण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले. महसूल गुप्तचर विभागाकडून सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटला पकडण्यात आले आहे.
 
 
 
mumbai
 
 
महसूल गुप्तचर विभागाने मुंबईच्या विमानतळावर कारवाई करतांना सुमारे ३.२ किलो परदेशी सोन्याची धूळ (वॅक्स स्वरूपात) जप्त केली असून त्याची किंमत जवळजवळ ५ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात महसूल गुप्तचर विभागाने ३ बांग्लादेशी नागरिक व श्रीलंकन नागरिक, ३ विमानतळ कर्मचारी आणि १ रिसिव्हर अश्या एकूण 7 जणांना अटक केली आहे.
 
 
महसूल गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बँगकॉकहून मुंबई मार्गाने प्रवास करणारे नागरिक आपापल्या शरीरात सोनं लपवून आणून मुंबईतील एजेंटला पोहचवत होते. कारवाईदरम्यान दोन बस चालक आणि एका कोच मॉनिटरला सोन्याची डिलिव्हरी करताना पकडण्यात आले. अटक केलेल्या सर्व आरोपींवर कस्टम्स कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली असून प्राप्त मुद्देमाल हा कस्टम्स कायद्याच्या अंतर्गत जप्त केला आहे. संदर्भित विषयावर पुढचा तपास ही सुरू करण्यात आला आहे.