‘गोसेखुर्द’चा लघू कालवा फुटला

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
भागडी येथील शेतकरी अडचणीत

सोनी, 
Gosekhurd Project गोसेखुर्द प्रकल्पच्या वितरिकेचा लघू कालवा लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील शेतशिवारात फुटल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रकल्प प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
Gosekhurd Project
 
Gosekhurd Project  कालवा फुटून पांदण रस्त्याला अडथळा निर्माण झाल्याने शेतक-यांची शेतावर ये-जा आणि शेतीमालाची वाहतूक करण्यास अडचणीचे होत आहे. या ठिकाणी पुलाची कोणतीही व्यवस्था नसल्याने शेतकèयांना आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल सात ते आठ किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. परिणामी इंधन, वेळ आणि श्रम याचा मोठया प्रमाणात अपव्यय होत असून शेतीमाल वाहतुकीचा खर्च सुद्धा वाढला आहे.