प्रेयसीवर पैसे उडविण्यासाठी नातवानेच आजीला लुटले

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
१.९३ लाखांचा मुद्देमाल केला लंपास : आरोपी नातवाला अटक

अनिल कांबळे
नागपूर
Grandson robbed grandmother प्रेयसीवर पैसे खर्च करण्यासाठी आणि तुला महागडे गिफ्ट देण्यासाठी नातवानेच स्वत:च्या सख्ख्या आजीच्या घरावर डल्ला मारला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने कारवाई करत आरोपी नातवाला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. तुषार (21) असे आरोपी नावाचे नाव आहे.
 
 
chori
 
Grandson robbed grandmother  माहितीनुसार, सुभद्रा (६०, इंदिरानगर) यांनी घरातील कपाटात १३ हजार रुपयांची रोकड, सोन्याची चैन, अंगठी आणि कानातले असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल ठेवला होता. मात्र, ३० मे ते २ जूनच्या दरम्यान त्यांना कपाटातील हा ऐवज दिसून आला नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने हा माल चोरल्या प्रकरणी त्यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरात आणि नातेवाइकांमध्ये चौकशी सुरू केली. या तपासादरम्यान २९ मे रोजी दुपारी सुभद्रा यांचा नातू तुषार हा आजीच्या घरी आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. संशय आल्याने पोलिसांनी तुषारला ताब्यात घेतले आणि त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने आजीच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली.
 
 
प्रेयसीवर करणार होता खर्च
तुषार ने त्याच्या प्रेयसीवर पैसे खर्च करायचे होते आणि त्यासाठीच ही चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. तुषारने चोरलेले सोन्याचे दागिने एका सोनाराला विकले होते. पोलिसांनी त्या सोनाराचा शोध घेऊन त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले. या प्रकरणी आरोपी तुषारला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल सुखरूप जप्त केला आहे.