कुटुंबीयांचा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनावर आरोप
हिंगणघाट,
Hinganghat Sub-District Hospital येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉटरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सम्यक कळमकर (१९) रा. आजंती असे मृत युवकाचे नाव आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता सम्यकचे अचानक हात, पाय व छाती दुखत असल्याने त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉटरांनी कामचलाऊ उपचार करून सम्यकची प्रकृती चांगली असल्याचे सांगत रात्री १ वाजता त्याला सुटी दिली. परंतु, १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता परत सम्यकची प्रकृती बिघडली.
Hinganghat Sub-District Hospital त्याला तातडीने पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉटरांनी तात्पुरती सलाईन व इंजेशन देऊन प्रकृती व्यवस्थित असून घाबरू नका, असे म्हणत त्याला सुटी दिली. सम्यक घरी येऊन जेवण करून औषध घेऊन झोपल्यानंतर २ मे रोजी सकाळी त्याला झोपेतून उठवायला कुटुंबीय गेले असता सम्यकचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉटरांच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप वडील मनोज व आई त्रिशला यांनी केला. जिल्हा शल्य चिकित्सक व आ. समीर कुणावार यांना निवेदन देऊन या मृत्यूला जबाबदार डॉटरवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
‘त्या’ रुग्णाला भरती होण्यास सांगितले होते : वैद्यकीय अधीक्षक
तो रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आला होता. दुसर्यांदा जेव्हा तो आला तेव्हा त्याला डॉटरांनी भरती होण्यास सांगितले होते. परंतु, त्याने दुसर्या दिवशी पेपर असल्याने भरती होण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला औषधी देऊन सोडण्यात आले होते, अशी प्रतिक‘ीया वैद्यकीय अधीक्षक डॉ. लांडे यांनी सांगितले.