संपूर्ण जगात हाहाकार उडणारतेलाचा पडणार ‘दुष्काळ’?

होर्मूझ बंदीनंतर इराणकडून मोठी धमकी

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
Iran war मागील काही महिन्यांपासून इराणसह आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला करत सुप्रीम लीडर आयतुल्ला खामेनेई यांना संपवलं आहे. या घटनेनंतर तर पश्चिम आशियातील देशांमधील तणाव वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी इराण आणि अमेरिकेचं शिष्टमंडळ चर्चेच्या विविध बैठका घेत आहे. मात्र, यातून काहीच तोडगा निघताना दिसत नाहीत. यामुळे हा तणाव आणखी वाढत चालला आहे.

iran war1 
Iran war आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पृष्ठभूमीवर संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक असलेल्या ‘बाब-अल-मंदेब स्ट्रेट’बंद करण्याची थेट धमकी दिली आहे. हा मार्ग रेड सी आणि एडनचे आखात तसेच अरबी समुद्राला जोडणारा मुख्य दुवा मानला जातो. जर इराणने हा मार्ग रोखला, तर भारत आणि जपानसह संपूर्ण आशिया खंडातील तेल पुरवठ्यावर याचा अत्यंत गंभीर परिणाम होण्याची भीती जागतिक ऊर्जा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Iran war  ‘बाब-अल-मंदेब’ मार्ग का महत्त्वाचा?
जागतिक तेल वाहतुकीसाठी आणि एकूणच सागरी व्यापारासाठी बाब-अल-मंदेब हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. गेल्या काही महिन्यांत ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’मधून होणाèया तेल निर्यातीत मोठी घट झाल्यानंतर, ’बाब-अल-मंदेब’ ही सामुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी एक मोठा आशेचा किरण ठरली.
 
Iran war कप्लर या संस्थेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या मार्गाचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात या मार्गावरून प्रतिदिन 3.9 दशलक्ष बॅरल तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात होत होती, ती एप्रिल महिन्यापर्यंत तब्बल 7.2 दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढ्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.