बुद्धिबळ स्पर्धेत अर्पित गुप्ता प्रथम

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
नागपूर येथील खासदार क्रिडा महोत्सव

लाखनी, 
'khasadar krida mahotsav 2026' नागपूर येथे खासदार क्रीडा महोत्सव 2026 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत लाखनी येथील बुद्धिबळपटू प्रथम अर्पित गुप्ता यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण 449 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
 
 
Arpit
 
'khasadar krida mahotsav 2026'  अत्यंत चुरशीच्या सामन्यांनंतर प्रथम अर्पित गुप्ता यांनी विजेतेपद मिळवले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रथम अर्पित गुप्ता यांचा पदक व सन्मानचिन्ह देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रथम अर्पित गुप्ता यांच्या या यशामुळे लाखनी परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.