महाराष्ट्र टायगर्स ठरला ‘रॉबस्ट प्रीमियम लीग’चा विजेता

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
Maharashtra Tigers Robust Premium अजय साहू स्मृती रॉबस्ट जिम, वर्धा यांच्या वतीने रॉबस्ट प्रीमियर लीग (आरपीएल) २०२६ कि‘केट स्पर्धेचे आयोजन ६ रोजी अग्निहोत्री टर्फ, रामनगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र टायगर्स रॉबस्ट प्रीमियम लीगचा चमू विजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, सुनील साहू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ना. डॉ. भोयर यांनी युवकांनी खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले.
 
 
Robust
 
आयोजक अश्विन साहू म्हणाले, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे समाजातील युवकांना सतत नवी दिशा व ऊर्जा मिळत असून अश्या स्पर्धांचे आयोजन करण्याकरिता बळ मिळते. रॉबस्ट जिमच्या वतीने आयोजित या स्पर्धेत परिसरातील आठ संघांनी सहभाग नोंदविला. खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांना दर्जेदार कि‘केटचा अनुभव दिला. प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
 
 
 
Maharashtra Tigers Robust Premium  स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सावंगीचे ठाणेदार विनोद गिरी, प्रदीप बजाज, झुबेर शेख, मुन्ना सिद्दीकी, पत्रकार संरक्षण समितीचे वर्धा तालुकाध्यक्ष संजीव वाघ तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष अश्विन साहू यांची उपस्थिती होती. या थरारक स्पर्धेत महाराष्ट्र टायगर्स संघाने विजेतेपद पटकावत प्रथम क‘मांक मिळविला तर रॉबस्ट धुरंधर संघाने उपविजेतेपद मिळवत द्वितीय स्थान पटकावले. विजेता व उपविजेता संघ तसेच उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.