सिएटल
Indian Mango अमेरिकेतील सिएटल येथे आयोजित करण्यात आलेल्या मँगो मॅजिक कार्यक्रमात भारतीय आंब्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. हापूस, केसर, दशहरी आणि लंगडा यासारख्या लोकप्रिय आंब्यांच्या जाती अमेरिकन ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. त्यामुळे सिएटलच नव्हे तर कॉस्टको या मोठ्या रिटेल साखळीच्या स्टोअरमध्ये भारतीय आंब्यांचा संपूर्ण साठा अवघ्या दोन तासात विकला गेला. याने जागतिक बाजारपेठेत भारतीय आंब्यांची वाढती लोकप्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे.
Indian Mango सिएटलमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ‘मँगो मॅजिक : प्रमोशन अॅण्ड टेस्टिंग ऑफ इंडियन मँगोज’ या कार्यक्रमाचे सलग दुसèया वर्षी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय फळांचे प्रमुख आयातदार आणि अमेरिकेतील मोठ्या रिटेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
Indian Mango कार्यक्रमात महाराष्ट्रातील हापूस, केसर, आंध्रातील बेगमपल्ली, हिमायत, उत्तरप्रदेशातील दशहरी आणि लंडगा, तसेच गुजरातमधील राजापुरी या आंब्यांच्या जातींचे प्रदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी आंब्यांची चव चाखली आणि आंब्यापासून तयार केलेल्या विविध भारतीय खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय आंब्यांना अमेरिकन बाजारपेठेत लोकप्रिय बनवणे हा होता.