हरिद्वारमध्ये भीषण अग्नितांडव; बस आगीच्या विळख्यात

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
हरिद्वार,
Massive fire in Haridwar हरिद्वार मध्ये सर्वानंद घाट जवळ एक मोठी घटना घडली. देहेराडून ते दिल्ली जाणाऱ्या एक निजी बसला भीषण आग लागली. आग लागताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला आणि पाहता पाहता बस आगीचा गोळा बनली. मिळालेल्या माहितीनुसार बस मध्ये चारधामचे ३५ ते ४० यात्री बसलेले होते, काहींनी वेळेवर बसमधून उडी मारली आणि आपला जीव वाचविला."सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.

Haridwar
प्राथमिक तपासामध्ये आग लागण्याचे कारण डिझेल गळती असल्याचे सांगितले जात आहे. हरिद्वारमध्ये एका हफ्त्यात बसमध्ये आग लागण्याची हि दुसरी घटना आहे. हरिद्वारमध्ये जून महिन्याच्या सुरवातीला एक डबल डेकर बसची आणि एक वेगवान डंपरची टक्कर झाली होती. या घटनेट बस रस्त्याच्या किनाऱ्यावर पालटली आणि एक महिलेची मृत्यू सुद्धा झाला आणि ३७लोक जखमी झाले. बसला धडक दिल्यानंतर डंपर एका ढाब्यामध्ये शिरला होता. बसमध्ये एकूण ४५ प्रवासी सवार होते, जे गंगा स्नानासाठी हरिद्वारला आले होते आणि राजस्थानला परतत होते. या घटनेचा सीसीटीव्ही पण समोर आलेला आहे. यानंतर पोलिसांनी डंपर चालकाला पकडले होते आणि प्रकरणाचा तपास सुरू केला होता. विशेष म्हणजे, देशात अनेक प्रसंगी बसेस अपघाताचा बळी ठरल्या आहेत, ज्यामध्ये आग लागल्यामुळे बस जळून खाक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने बस प्रवासाबाबत कडक नियम बनवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे.