मानोरा,
चारा-पाणी आणि चरणासाठी वनवेगवेगळ्या भागात भटकंती करणार्या mendhpal samaj मेंढपाळ समाजाची स्थलांतरे सुरू झाली आहेत. मुर्तीजापुर तालुक्यातील मलकापूर या गावचे बंडू गंगाराम पचरे सह सहा मेंढपाळ कुटुंब तालुक्यातील कारखेडा येथे शेतकर्याच्या शेतात अस्थाई निवास करणार आहेत. मेंढपाळांच्या तांड्याने संसार उपयोगी साहित्य - गोधड्या, भांडी-कुंडी, कडे-करवंटी, पाण्याची कॅन व इतर गृहोपयोगी वस्तू बैलगाड्यांवर लादून भटकंतीस सुरुवात केली.
mendhpal samaj बैल, मेंढ्या व कुटुंबासह संपूर्ण संसार गाड्यावर घेऊन ते चारा-पाण्याच्या शोधात एका गावातून दुसर्या गावाकडे मार्गस्थ झाले. उन्हाळ्यात चरणासाठी व पावसाळ्यानंतर परतीच्या प्रवासासाठी असे स्थलांतर मेंढपाळ समाजाची परंपरा आहे. मात्र चराऊ कुरणे कमी होणे, वनजमिनीवर निर्बंध व पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे त्यांची भटकंती वाढली आहे. शासनाने मेंढपाळ समाजासाठी कायमस्वरूपी चराऊ कुरणे व पाणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.