- बच्चू कडू यांचा गोंदियातील शिवसैनिकांना सल्ला
गोंदिया,
माझ्यासाठी अनेक पक्षामध्ये जाण्याच्या वाटा मोकळ्या होत्या. मात्र, मी एकनाथ शिंदेंकडे जाण्याचा पर्याय निवडला कारण ते एकमेव मर्द आहेत. रात्री दोन वाजत असताना आणि ते सीएम असताना एखाद्या सामान्य शेतकऱ्यांना भेटत असतात हेच तर एकनाथ शिंदे साहेब यांची खरी ओळख आहे. आणि हेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आहे. मित्रांनो सत्तेत आहोत म्हणून स्वस्त बसून राहू नका, मस्त होऊ नका, सत्तेत आहोत म्हणून काही करताच येत नाही असे जर वाटत असेल अन् मंत्री जरी आपला असला आणि चुकत असेल तर त्याला ठोकल्या शिवाय राहू नका असा रोखठोक सल्ला विधान परिषदचे MLA bachchu kadu आमदार बच्चु कडू यांनी गोंदियाच्या देवरी येथे रविवारी ७ जून रोजी आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात शिवसैनिकांना दिला.
MLA bachchu kadu आपल्या तडाखेबंद अध्यक्षीय भाषणात कर्जमाफी आणि दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवरून सरकारवर कडक शब्दांत प्रहार करताना ते बोलत होते. देवरी येथील आफताब मंगल लॉन येथे शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळा रविवारी पार पडला. माजी आ. सहसराम कोरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. या प्रसंगी इतर पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मंचावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री दीपक सावंत, विधान परिषद सदस्य मनिषा कायंदे, माजी आ. मनोहर चंदिकापुरे, शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख सुरेंद नायडू, रुपेश कुथे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना बच्चू कडू यांनी "दीन-दुबळे, दिव्यांग बांधव आणि अन्नदाता शेतकरी यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या हिताकरिता मी सदेव पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी शिवसेना पक्षाच्या विस्तारकीकरणाचा संकल्प मांडत आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पक्ष बळकटीकरणावर भर दिला. तसेच, शेतकऱ्यांच्या सिंचन, वीज आणि पिकांच्या दराविषयीच्या समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसंगी, मेळाव्यात उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन बळकटीकरण, आगामी निवडणुकांची तयारी आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन केले.