मारेगाव पोलिसांची धडक कारवाई
खुनातील तिन्ही आरोपींना केले जेरबंद
मारेगाव,
Murder case तालुक्यातील दांडगाव परिसरात एका खड्ड्यात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची कसलीही ओळख पटत नव्हती. परंतु मृतकाच्या हातातील कडे आणि तंबाखूची डबी यामुळे या खुणातील धागेदोरे पोलिसांच्या कारवाईने शोधून काढत अशक्य वाटत असलेल्या या खून प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या अवघ्या 24 तासाच्या आत आवळल्या.
शुक्रवार, 5 जून रोजी दोंडगाव शिवारात गौतम ठमके यांच्या शेतालगतच्या जंगलातील खड्ड्यात कुजलेल्या अवस्थेतील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला होता. मारहाणीच्या खुणा असल्याने घातपाताचा संशय होता. मारेगाव पोलिसांनी तपास सुरू केला होता.
मारेगावचे ठाणेदार श्याम वानखेडे यांनी फॉरेन्सिक, हस्तरेषा व श्वानपथकासह तीन स्वतंत्र पथके नेमली. विंचवाचा टॅटू व कपड्यांच्या वर्णनावरून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी गावात तपास केला. शेतकरी जुल्फीकार पठाण यांनी छायाचित्रांवरून मृताची ओळख विनोद प्रल्हाद सहारे (35, मरेगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) अशी पटवली. कुटुंबीयांनीही ओळख निश्चित केली.
Murder case तपासात आरोपी प्रवीण अशोक वरधने (35, आपटी), राजू नथ्थू ढेंगळे (35, दोंडगाव) व शंतनू झाडे (18, नागरी, ता. वरोरा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विनोद सहारे हा प्रवीण वरधनेची बहीण शारदा झाडे हिला वारंवार त्रास देत होता. याचा राग मनात धरून 3 जून रोजी तिघांनी संगनमत केले. वरोरा रेल्वे स्थानकावरून विनोदला मोटारसायकलवर बसवून मार्डा डॅम परिसरात आणले. तेथे त्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलातील खोल खड्ड्यात फेकून दिला. ही कारवाई ठाणेदार श्याम वानखेडे, उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहायक उपनिरीक्षक दिगंबर किनाके, सागर दीपेवार, राजन इसनकर तसेच शिरपूरचे सपोनि संतोष मनवर, इकबाल शेख व अजय वाभिटकर यांच्या पथकाने केली.