खाद्यतेलाच्या पॅकेजिंगसाठी कठोर नियम

आता प्रत्येक ब्रँडच्या पॅकेजिंगचा आकार सारखाच

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
Oil Packaging केंद्र सरकारने खाद्यतेल विकणाèया कंपन्यांसाठी नवीन आणि कठोर नियम जारी केले आहेत. आता देशात विकल्या जाणाèया सर्व खाद्यतेलाच्या पॅकेजिंगचा आकार एकसमान असेल. ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि बाजारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी कायदेशीर मापनशास्त्र नियमांमध्ये हा मोठा बदल केला आहे.
  
oil packaging
 
Oil Packaging  भारताच्या खाद्यतेल बाजारातील सुमारे 90 टक्के भागाचे प्रतिनिधित्व करणाèया खाद्यतेल उद्योगातील प्रमुख संघटनांशी विस्तृत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हे नवीन नियम देशांतर्गत उत्पादित आणि आयात केलेल्या दोन्ही तेलांना लागू होतील. यापूर्वी बाजारात विकल्या जाणाèया खाद्यतेलाच्या पाकिटांचे आकार 850 मिली, 900 मिली किंवा 950 मिली इतकेच मर्यादित होते. यामुळे ग्राहकांना तेलाच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या वास्तविक किंमतीची तुलना करणे खूप कठीण जात असे.
 
Oil Packaging  अनेकदा कंपन्या पॅकेजचा आकार तोच ठेवत, पण त्यातील तेलाचे प्रमाण कमी करत असत. व्यवसायाच्या भाषेत याला श्रिंकफ्लेशन म्हणतात. नवीन नियमांमुळे कंपन्यांच्या या मनमानी वर्तनाला पूर्णपणे आळा बसेल, असा दावा करण्यात येत आहे.
 
Oil Packaging  नवीन आदेशानुसार, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेल, शेंगदाणा, तीळ, राइस ब्रॅन, कापसाचे तेल आणि मक्याचे तेल आता फक्त सरकारने निश्चित केलेल्या आकारातच विकले जातील. घरगुती वापरासाठी 200 मिली/ग्रॅम, 500 मिली/ग्रॅम, 1 लिटर/किलोग्रॅम, 2 लिटर/किलोग्रॅम, 3 लिटर/किलोग्रॅम, 4 लिटर/किलोग्रॅम आणि 5 लिटर/किलोग्रॅम. तर हॉटेल किंवा घाऊक बाजारांसाठी 15 लिटर/किलोग्रॅम आणि 20 लिटर/किलोग्रॅमचे पॅकेज असेल. तसेच गरिबांसाठी छोटे पाऊच उपलब्ध राहतील.
 
Oil Packaging  वजन ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये नमूद करणे बंधनकारक
कमी विक्री होणाèया आणि कमी प्रमाणात उत्पादित होणाèया काही तेलांनाही या नियमावलीतून सूट देण्यात आली आहे. वजन आणि आकारमान दोन्ही नमूद करणे अनिवार्य आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, जर एखादी कंपनी पॅकेजवर तेलाचे प्रमाण लिटर किंवा मिलीलीटरमध्ये देत असेल, तर त्यापुढे एकूण वजन (ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये) स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना कोणता ब्रँड फायदेशीर आहे, हे समजणे सोपे होईल.