जीवलग मित्राने स्वतःच्या रक्ताने रेखाटले मैत्रीचे भावविश्व
आर्णी,
picture drawn with blood मैत्री म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील संबंध नसून, तो विश्वास, भावना आणि निःस्वार्थ प्रेमाचा एक सुंदर असा संगम असतो. याच मैत्रीचे एक हृदयस्पर्शी आणि अनोखे दर्शन नुकतेच तळणी येथे पाहायला मिळाले. येथील अजिंक्य संदीप पोतगंठवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जिवलग मित्र सेजल नवनीत देवपुलवार यांनी स्वतःच्या रक्ताचा वापर करून अजिंक्य यांचे हुबेहुब चित्र रेखाटले आणि त्यांना एक अनमोल भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटवस्तूची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
अजिंक्य आणि सेजल यांची जिवलग मैत्री अनेक वर्षांपासून अतूट आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणाèया या मित्रांच्या नात्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारी ही घटना ठरली आहे. आपल्या जिवलगाच्या वाढदिवसाला काहीतरी विशेष आणि कायम स्मरणात राहील अशी भेट द्यावी, या भावनेतून सेजल यांनी रक्ताच्या माध्यमातून अजिंक्य यांचे आकर्षक चित्र रेखाटले. हे चित्र साकारण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. चित्रातील बारकावे, चेहèयावरील भाव आणि कलाकुसरीमुळे हे चित्र अत्यंत प्रभावी झाले आहे.
picture drawn with blood वाढदिवशी जेव्हा सेजल यांनी ही अनोखी भेट अजिंक्य यांना दिली, तेव्हा ते भावूक झाले. आपल्या मित्राने दाखविलेल्या या प्रेमाची आणि जिव्हाळ्याची त्यांनी मनःपूर्वक दखल घेतली. या घटनेमुळे परिसरात मैत्रीच्या नात्याबद्दल हृद्य चर्चा असून, अनेकांनी सेजल यांच्या या कल्पकतेचे आणि मित्रप्रेमाचे कौतुक केले आहे. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते कधीकधी अधिक घट्ट असते, याची प्रचिती देणारी ही घटना आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, खèया मित्रप्रेमाचा हा अनोखा आविष्कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.